विश्वकर्मा जयंती , पूजा व महत्व

देवी देवतांच्या नगरी, वास्तुचा चा शिल्पकार कोणी असेल तर तो म्हणजे कोण ? तर भगवान विश्वकर्मा. भगवान विश्वकर्मा यांची जयंती नेहमी सप्टेंबर महिण्यातच येत असते. हिन्दी दिनदर्शिका नुसार कन्या संक्रांतीलाच याचा योग असतो. या वर्षी ती 17 सप्टेंबरला आली आहे.

कोण आहे भगवान विश्वकर्मा

विश्वकर्मा देव हे पहिले सृष्टीचें वास्तुशास्त्रज्ञ आहेत . ज्यांनी ब्रम्हाजींना सृष्टीच्या निर्माणा करीता मदत केली आहे तसेच कृष्णाच्या द्वारका, सुदामापुरी ,लंकापूरी, यमपुरी, कुबेरपुरी, यांची निर्मिती केलेली आहे. 

 विश्वकर्मा ची संतती 

भगवान विश्वकर्मा ला 5 मूले होती, त्यांची नावे मनु, मय, त्वष्ठा, शिल्पी आणि देवज्ञ हि होती. ती सुद्धा आपआपल्या परिने अनेक धातू निर्माण कार्याकरीता प्रसिद्ध होती.

 विश्वकर्मा पूजेचे महत्व

हि पूजा कारखाणेदार तसेच त्यात काम करणारे कारागीर शक्यतो लोखंडासंबंधी व विदयुत शास्त्राशी निगडीत असलेले लोक करीत असतात. हि पूजा केल्याने धंदयात समृद्धी येते अशी श्रद्धा आहे. संपूर्ण भारत देशात या पूजेला महत्व दिल्या गेलेले आहे.

अस्विकरण

हा लेख उपलब्ध असलेल्या ग्रंथाच्या आधारे, व प्राप्त झालेल्या माहीती च्या आधारे लिहीण्या त आलेला आहे. शक्य तेवढी खरी माहीती देण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे. माहीती वाचकापर्यंत पोहचविने हाच एक शुद्ध हेतू लेखकाचा आहे. माहितीत काही विसंगती असु शकते असल्यास लेखक जवाबदार राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *