दिवाळी
दिवाळी हा हिन्दूधर्मियांचा सर्वात महत्वाचा असा सण आहे . दिवाळी हा दिव्यांचा सण आहे . अंधारावार उजेडाची मात , अज्ञानावर ज्ञानाची मात तर वाईटावर चांगल्याची मात हे प्रतिक दिवाळीसाठी समजले जाते .
दिवाळी किती दिवसांची असते ?
दिवाळी हा सण ५ ते ६ दिवसांचा असतो . तिथी नुसार कधी तो ५ दिवसांचा येतो तर कधी ६ दिवसांचा येतो . पहिला दिवस वसुबारस,धनत्रोयदशी दुसरा दिवस, नरकचतुर्दशी तिसरा दिवस,लक्ष्मीपूजन : अश्विन अमावस्या चवथा , पाचवा दिवस बलिप्रतिपदा : कार्तिक शुद्ध प्रतिपदा, सहाव भाऊबिज : कार्तिक शुद्ध द्वितीया हा आहे .
दिवाळी कधी असते ?
अश्विन वद्य १३ पासून कार्तिक शुद्ध २ पर्यंत दिवाळी हा सण पाळतात . साधारणतः विजयादशमी / दसऱ्या पासुन २० दिवसा नंतर हा सण येत असतो. त्याच्याइतका मोठा व महत्वाचा सण हिंदू लोकांत नाही . या सणांत पुष्कळ दिवे लावून आरास करण्याची चाल सर्वत्र आहे.
वसुबारस
घनोत्रोदशी
नरकचतुर्दशी : अश्विन वद्य चतुर्दशी
या दिवशी पाहटेस लवकर उठून जिकडे तिकडे दिवे लावतात . नंतर घरातील सर्व लहानथोर मंगळी स्नान करतात. स्नान आटोपताच डाव्या पायाने नरकासुर म्हणून कारंटे फोडतात . लहान मुले स्नान करीत असताना फटाके उडविले जातात . इष्टमित्रांसहित उत्तम प्रकारचा फराळ करतात . भोजन झाल्यावर करमनुक करून सर्व दिवस आनंदात घालवितात. रात्री दिवे लावून आरास करतात.
लक्ष्मीपूजन : आश्विन अमावस्या
या दिवशी सायंकाळी घरोघरी लक्ष्मीची पूजा करतात. घरातील आंगणात रांगोळ्या काढल्या जातात तसेच
पणत्या लावल्या जातात व दिव्यांची रोषणाई केल्या जाते .
बलिप्रतिपदा : कार्तिक शुद्ध प्रतिपदा
हा दिवस साडेतिन मुहूर्तापैकी एक मुर्हूत आहे. या दिवशी बलीचे चित्र काढून त्यांची पूजा करतात . विक्रमसंवत सुरु असल्यामुळे व्यापारी लोक नविन वर्षारंभ समजतात .
भाऊबिज : कार्तिक शुद्ध द्वितीया
या दिवशी बहिनीकडून ओवाळून घेऊन ओवाळणी घालती जाते .
दिवाळीचे स्वागत
दिवाळी हा सर्वात महत्वाचा सण हिन्दू , जैन, शिख धर्मात माणल्या जातो . हा सणाच्या स्वागतासाठी सर्वच लोक उत्साहाने तयार असतात . जवळपास सर्वांच्या घरी साफसफाई रंगरंगोटी केल्या जाते . लहान मुले आबाल वृद्धां ना नविन कपडे घेतल्या जातात . घरी फराळ बनविल्या जातो . लहान मुलांना फटाके घेतल्या जातात .
दिवाळीचे धार्मिक महत्व
दिवाळीचे सांस्कृतिक महत्व
दिवाळीचे आर्थिक महत्व
.
दिनांक | मुहूर्त |
---|---|
१ नोव्हेंबर | वसुबारस |
२ नोव्हेंबर | धनोत्रयोदशी |
३ नोव्हेंबर | नरकचर्तुदशी |
४ नोव्हेंबर | लक्ष्मीपुजन |
५ नोव्हेंबर | बलिप्रतिपद |
६ नोव्हेंबर | भाऊ -बिज |